Breaking News
रत्नागिरी : मुन्ना देसाईंसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप

दापोली : भावाच्या खून प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी

banner 468x60

दापोलीमधील उन्हवरे येथे सख्ख्या भावाच्या डोक्यात फरशीने वार करून खून प्रकरणी अटक करण्यात आलेला रवींद्र गणपत तांबे याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90


दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ जुलै रोजी रात्री ११.४५ वाचण्याच्या दरम्यान उन्हवरे बौद्धवाडी येथे रवींद्र तांबे याने आपला लहान भाऊ विनोद तांबे यांच्या डोक्यात फरशीने वार करून ठार मारले होते. भावकीमध्ये विनोद अपशब्द बोलला व शिवीगाळ केली म्हणून हा प्रकार घडला होता.


याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात संदीप तांबे यांनी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीनुसार रवींद्र तांबे याच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३चे कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. रवींद्र तांबे याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *