चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील एका ३४ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिपेश संजय कदम (34) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपेश कदम याने ३ जुलै २०२५ रोजी चिपळूण येथे विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना तातडीने चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. पुढे, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आणि अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना ८ जुलै २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले.
तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, ९ जुलै २०२५ रोजी पहाटे निधन झाले.
या घटनेची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













