चिपळूण नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते बाळा कदम यांची कन्या कुमारी पौरवी तृप्ती महादेव उर्फ बाळा कदम हिने भारती विद्यापीठ, पुणे येथून आयुर्वेदाचार्य (BAMS) ही वैद्यकीय पदवी मिळवून आयुर्वेद क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.
पौरवी हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ग्रामीण व सर्वसामान्य जनतेसाठी सुलभ आणि परिणामकारक आरोग्यसेवा देण्याचा माझा मानस आहे.” तिच्या या यशाचे चिपळूण शहरात आणि परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्या या घवघवीत
यशामागे मातापित्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, प्राध्यापकांचे पाठबळ आणि स्वतःचा सातत्यपूर्ण अभ्यास हे कारणीभूत ठरले आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून रोगनिवारण आणि आरोग्य संवर्धन हे ध्येय समोर ठेवून पौरवी लवकरच समाजसेवेसाठी कार्यरत होणार आहे.
या यशाबद्दल तिचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या पुढील वैद्यकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















