भारतीय हवामान विभागाने राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात चक्री वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता असून नद्या व नाले ओसंडून वाहण्याचा धोका आहे.
किनारपट्टी भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विशेषतः घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता असून काही सखल भागांत पाणी साचू शकते. नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे हवामान खात्याचे आवाहन आहे.
औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान ढगाळ राहील. वादळी वाऱ्यांपासून फळबागा आणि पीकांचे संरक्षण करण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड व येलो अलर्ट जारी केला आहे.
विशेषतः नागपूर व गोंदियात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांंमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण रायगड मधील म्हसळा तालुक्याला जोरदार पावसाने झोडपलं असून म्हसळा मधील ढोरजे पूल पाण्याखाली गेला आहे. म्हसळा तालुक्यात सकाळपासून तुफान पाऊस सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















