जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दापोली परिसरात गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नांतून फुललेली दुर्मीळ कोकण दीपकाडी या वनस्पतीच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही वनस्पती कोकणात केवळ २५ ठिकाणीच आढळते, आणि मानवी हस्तक्षेपामुळे तिचा अधिवास झपाट्याने नष्ट होत आहे. त्यामुळे दीपकाडी व तिच्या नैसर्गिक अधिवास असलेल्या कातळी सड्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
या उपक्रमासाठी ‘Wild Animal Rescue and Research’ ही संस्था आणि वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अमित मिरगळ सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी “Dipcadi: From Extinction to Expansion” या मोहिमेअंतर्गत संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे.
या वनस्पतीचे दापोलीतील सड्यांवर पुनर्स्थापन करून संवर्धन व पुनरुत्पादन केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी स्थानिक जनतेचा सहभाग अत्यावश्यक आहे. त्यामुळे लवकरच जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी कातळी भागांची आवश्यकता आहे. यासाठी काही नागरिकांनी आधीच आपली जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजूनही जर कोणी अशी जागा उपलब्ध करून देऊ इच्छित असतील, तर त्यांनी पुढे येऊन या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.
या चर्चेत दापोली वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांचीही उपस्थिती होती.
त्यांनी या उपक्रमाला आवश्यक सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. “लोकसहभागाशिवाय संवर्धन शक्य नाही,” या भावनेतूनच या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. जैवविविधतेचे रक्षण हे प्रत्येकाचे सामूहिक कर्तव्य आहे आणि भविष्यासाठी तिचे संवर्धन गरजेचे आहे.
संपर्कासाठी: Wild Animal Rescue and Research
डॉ.अमित मिरगळ 95455 55234
मिलिंद गोरीवले 9764454454
तुषार महाडिक 7499068810
मनीत बाईत 919075226883
सतीश दिवेकर 9307674632

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*