गुहागर : बेपत्ता 85 वर्षीय वृद्धेचा विहिरीत आढळला मृतदेह

banner 468x60

गुहागर तालुक्यातील झोंबडी, गुरववाडी येथे बेपत्ता झालेल्या एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह गावातीलच एका पडक्या घराजवळील विहिरीच्या पाण्यात बुधवारी (२५ जून २०२५) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. हिरु धोंडू गुरव (वय ८५, रा. झोंबडी, गुरववाडी, ता. गुहागर) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरु धोंडू गुरव या २४ जून रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्यांचा आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु त्या कुठेही सापडल्या नाहीत.

त्यानंतर, २५ जून रोजी गुहागर पोलीस ठाण्यात हिराबाई गुरव बेपत्ता असल्याची नोंद (नापत्ता रजि. क्र. १०/२०२५) करण्यात आली होती. शोधकार्य सुरू असतानाच, त्याच दिवशी सायंकाळी झोंबडी येथील केशव दर्वे यांच्या पडक्या घराच्या पाठीमागील विहिरीच्या पाण्यात हिराबाई यांचा मृतदेह आढळून आला.


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *