गुहागर : हायस्कूलमधील 8 कॉम्प्युटर संच चोरीला

Screenshot

banner 468x60

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली मध्ये चोरी झाली असून चोरट्यांनी जुने नादुरुस्त असलेले ८ संगणक संच चोरीला गेल्याचे निदर्शनात आले आहे.

कोकण कट्टा न्यूज

banner 728x90 banner 728x90

त्यामुळे या परिसरात एकच खळबळ माजली सध्या गुहागर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या हायस्कूलमध्ये ८ मॉनिटर, ८ सीपीयू, ६ यूपीएस बॅटरी त्याचबरोबर मैदानात इमारतीसाठीचे ठेवलेले स्टील देखील चोरीला गेल्याचे निदर्शनात आले आहे.

सदरील चोरी ही शनिवार, दि. ७ व ८ जून रोजी झाल्याचा अंदाज आहे. याविषयी प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी तात्काळ गुहागर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. चोरीची बातमी कळताच गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत तातडीने प्रशालेत पोहोचले आणि पाहणी केली.

प्रशालेत सीसीटीव्ही असतानाही चोर सीसीटीव्हीमध्ये दिसून येत नाहीत. यामुळे चोरांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे. मुख्याध्यापक यांनी तात्काळ गुहागर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. चोरीची बातमी कळताच गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत तातडीने प्रशालेत पोहोचले आणि पाहणी केली. प्रशालेत सीसीटीव्ही असतानाही चोर सीसीटीव्हीमध्ये दिसून येत नाहीत. यामुळे चोरांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे.

प्रशालेतील एका अडगळीच्या खोलीमध्ये हे सर्व संगणक संच ठेवलेले होते. कुणालाही याठिकाणी हे साहित्य असेल याची शंका येऊ शकणार नाही, असे पाहणी केल्यास दिसून येते. तसेच ४ सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही एकाही कॅमेरामध्ये चोर दिसून आले नाहीत याचा अर्थ चोरांना येथील पूर्ण माहिती असावी, चोर हे जवळचेच असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान चोर पकडले जावेत यासाठी पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. मात्र तीन दिवस होऊनही अद्याप चोर मिळाले नाहीत. यामुळे हे चोर पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हानच असल्याचे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *