गुहागर तालुक्या मधील शृंगारतळी बाजारपेठ तसेच अन्य अनेक ठिकाणी बिर्याणी सेंटर, चायनीज सेंटर , पाणीपुरी सेंटरमध्ये घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर होत असून या विक्रेत्यांवर संबंधित विभागाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे काही पाणीपुरी सेंटर मध्ये बालकामगार काम करत असल्याचे निदर्शनासं येत असून बाल कामगार कायदा पायदुळी तुडवण्यात येत असल्याचे दिसत आहे.अनेक बिर्याणी सेंटर व चायनीज सेंटर मध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.अस्वच्छ जागेमध्ये अन्नपदार्थ बनवले जात असून याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत नाही ना ..? असाही सवाल विनोद जानवळकर यांनी उपस्थित केला आहे
. बिर्याणी सेंटर, चायनीज सेंटरमध्ये बिनधास्तपणे घरगुती सिलेंडरचा वापर होत आहे. ग्राहकांसाठी देण्यात आलेले पाणी पिण्यायोग्य दिले जाते का..? पिण्याच्या पाण्याची तपासणी आरोग्य विभागाकडून होत नाही. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणी केली जाते का.?
विनोद जानवळकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष
याची चौकशी संबंधित विभागाने करावी. शृंगारतळी
येथील पाणीपुरी सेंटर मधून दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये किडे असल्याचे काही दिवसांपूर्वी निदर्शनात आले होते, या विक्रेत्यावर कोणत्या प्रकारची कारवाई संबंधित विभागाने केली नाही. सदर विक्रेता आजही बिनधास्तपणे अन्नपदार्थांची विक्री करत आहे. या अन्नपदार्थाकडे लहान मुले जास्तीत जास्त आकर्षक होत आहेत, सदरचे अन्नपदार्थ खाऊन एखादी अनुचित घटना घडली याला जबाबदार कोण ..?
बिर्याणी सेंटर मधून अनेक ग्राहक बिर्याणीचा आस्वाद घेतात परंतु सदरची बिर्याणी ज्या जागेत बनवली जाते त्या जागेची अस्वच्छता दिसून येते. यातील काही विक्रेत्यांकडे अन्नभेसळ विभागाचा कोणत्याही प्रकारचा परवाना देण्यात आला नसताना देखील सदरचे विक्रेते बिनधास्तपणे व्यवसाय करत आहेत.
संबंधित विभागाने त्वरित या सर्व अन्नपदार्थ विक्री करणारे विक्रेत्यांवर तातडीने कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जन आंदोलन छेडू असा इशारा विनोद जानवळकर यांनी दिला आहे. गुहागर पुरवठा विभाग व्यवसायाकरिता घरगुती सिलेंडर वापरणाऱ्यांवर कारवाई करणार का? हे देखील पाहावं लागेल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*