Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

राजापूर : धोपेश्वर खंडेवाडीत चारचाकीवर विद्युत पोल कोसळुन नुकसान

banner 468x60

काल दिवसभर मुसळधार पडणार्‍या मान्सूनपूर्व पावसाने आज मात्र, तालुक्यामध्ये काहिशी विश्रांती घेतली होती. तरीही दिवसभर तालुक्यामध्ये सरींवर पाऊस पडत होता. पावसाचा दिवसभर जोर कमी झाला असला तरी, अनेक गावांमधील विजेची बत्ती गुल झालेली होती.

banner 728x90

काही गावांमध्ये वीजेचा पुरवठा कार्यान्वित असला तरी तो सातत्याने खंडीत होत होता. वीजेच्या या लपंडावाबाबत सर्वसामान्यांमधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात असून मान्सूनपूर्व पावसामध्ये अशी स्थिती असेल तर प्रत्यक्ष पावसाळ्यात काय स्थिती असेल ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


दरम्यान शहरानजिकच्या धोपेश्वर खंडेवाडी येथील संतोष खंडे यांच्या चारचाकीवर विज वाहीण्यांचा पोल पडल्याने त्यांच्या गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे . तर काल मंगळवारी धोपेश्वरघाटीवरील एक झाड पडल्याने वीजवाहीण्या तुटुन पडल्या होत्या .


गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत आहे. अशातच काल ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करीत तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडला. अक्षरक्षः पावसाने राजापूरवासियांना झोडपून काढले होते. पावसाळ्याच्या अनुषंगाने गटारांची साफसफाई केल्यानंतरही शहरातील अनेक भागामध्ये गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र होते.

मात्र, शहरामध्ये खुठेही फारसा चिखलाचे साम्राज्य झाल्याचे चित्र दिसत नव्हते. या पावसामध्ये तालुक्यामध्ये कुठेही फारसे नुकसान झाल्याची नोंद झालेली नाही. मात्र, काही गावांमध्ये वीजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडीत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून, अनेक गावांमधील विजेची बत्ती गुल झालेली आहे.

खंडीत झालेला वीजपुरवठा कार्यानेवित करण्याचे महावितरण विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी, सायंकाळी उशीरापर्यंत अनेक गावांमधील वीजपुरवठा कार्यान्वित झालेला नव्हता.

काल दिवसभरामध्ये तालुक्यामध्ये 44.62 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी आज मात्र, पावसाचा जोर कमी राहीलेला होता. दिवसभर सरींवर पाऊस कोसळत होता.  आजपर्यंत एकुण सरासरी ६८. ६१ मि मी पावसाची नोंद झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *