रत्नागिरी : नालासोपाऱ्यातून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या महिलेचा झोपेत मृत्यू

banner 468x60

मुंबईतून पर्यटन व देवदर्शनासाठी रत्नागिरीत आलेली महिला व तिचे कुटुंबीय माळनाका येथील एका हॉटेलात राहिले होते. महिला रात्री झोपलेली असताना घोरत होती. अचानक तिचे घोरणे बंद झाले व ती बेशुद्ध पडली.

तत्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला तपासून मृत घोषित केले.नीता नरेंद्र मेस्त्री (49, रा. नालासोपारा, जि. पालघर, मूळ रा.देवाचे गोठणे, ता. राजापूर ) असे मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना शनिवारी दि. 17) सकाळी 8.30 वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. निता मेस्त्री व तिची दोन मुले व तिच्या दोन बहिणींच्या कुटुंबियांसह रत्नागिरीत देवदर्शनासाठी गुरुवार 15 मे रोजी रत्नागिरीत आले होते. कुटुंबियांसह रत्नागिरी माळा नाका येथील अल्फा हॉटेलवर रहात होते. शुक्रवारी सकाळी ते कुटुंबिय आपल्या मुळ गावी देवाचे गोठणे-राजापूर येथे जाऊन आले.

रात्री जेवण करुन कुटुंबिय झोपले होते. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास निता या घोरत होत्या. मात्र त्या घोरत असताना त्यांचे घोरणे बंद झाले म्हणून नातेवाईकांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केला पण त्या बेशुद्ध पडल्या. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *