Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

रत्नागिरी : पोलिस भरतीत ओळख झाली, लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिसाची फसवणूक, कॉन्स्टेबल निलंबित

banner 468x60

रत्नागिरीतील एका कान्स्टेबलने लग्नाचे आमिष
दाखवून लग्नास नकार देत पुणे येथील महिला पोलिसाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समार आला आहे.

banner 728x90 banner 728x90

याप्रकरणी पुणे येथील वाघेली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या कान्स्टेबलला निलंबित करण्यात आले. अमोल मांजरे असे या कान्स्टेबलचे नाव आहे. पोलिस भरतीसाठी तो ट्रेनिंग घेत असलेल्या एका अकॅडेमीत त्याची एका महिला स्पर्धकाशी ओळख झाली होती.

त्यानंतर सन २०१८ मध्ये या दोघांचीही पोलिस भरतीत नियुक्ती झाली. अमोल रत्नागिरीत तर ती महिला पुणे येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांच्यात भेटी गाठी वाढू लागल्या. त्यानंतर अमोलने त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवले.

तिने अमोलकडे लग्नाचा तगादा लावला. त्यावेळी त्याने ‘माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी मुलगी पाहिलेली असल्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही,’ असे सांगितले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने याबाबत पुणे येथील वाघेली पोलिस स्थानकात दिली.
या तक्रारीची दखल घेत रत्नागिरी पोलिस विभागाने अमोल मांजरे याची प्राथमिक चौकशी होईपर्यंत निलंबन केले आहे. त्याची प्राथमिक चौकशी रत्नागिरी पोलिसच करणार असून, या गुन्ह्याचा तपास पुणे-वाघेली पोलिस करणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *