Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

रत्नागिरी : 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित, पालकमंत्री उदय सामंतांनी साधला संवाद

banner 468x60

रत्नागिरी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या पर्यटकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली आहे.

banner 728x90 banner 728x90

रत्नागिरीतून कुणाल देसाई यांच्यासह एकूण 20 जण श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेले होते. कुणाल देसाई हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवसाय उपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या क्लिनिकमधील कर्मचारी वर्ग देखील आहेत. जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील या पर्यटकांबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

याची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने हालचाल करत कुणाल देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

त्यावेळी देसाई यांनी सर्व पर्यटक सुरक्षित असून ते श्रीनगरमध्ये ठीक असल्याची माहिती दिली.
या घटनेमुळे रत्नागिरीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *