Breaking News
रत्नागिरी : पत्रकारांना धमकी प्रकरण : खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी, मराठी पत्रकार परिषदेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, मुजोर आणि गावगुंडाप्रमाणे शिवीगाळ करणाऱ्या खासदाराचा कोकण कट्टा न्यूजकडूनही निषेध दाभोळमध्ये ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण, गरजू रुग्णांसाठी ठरणार आधारवड चिपळूणमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी गुहागर युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा, कार्यकर्ता म्हणून राहणार सक्रिय चिपळूण : डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या आमिषाने चिपळूणच्या व्यावसायिकाची ₹10.20 लाखांची ऑनलाइन फसवणूक

गणपतीपुळे : सेल्फीने घेतला तरुणाचा जीव

banner 468x60

सेल्फी काढताना समुद्राच्या पाण्यात ताेल जाऊन पडलेल्या काेल्हापूर येथील तरुणाचा दुर्दैव्यारित्या बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी भंडारपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. इरफान झाकीरहुसेन जमादार (३४, रा. हेरले, ता. हातकणंगले, काेल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

banner 728x90

इरफान झाकीरहुसेन जमादार हा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत बुधवारी दुपारी रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते. देवदर्शन करून ते आरे-वारे मार्गे कोल्हापूरकडे निघाले हाेते.

याच मार्गावर गणपतीपुळेनजीकच्या भंडारपुळे गावातील एका हॉटेलजवळील समुद्रकिनारी फोटो काढण्यासाठी थांबले होते. ताे समुद्रातील खडकावर उभे राहून सेल्फी काढत हाेता. सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि ताे समुद्राच्या पाण्यात पडला. त्याचवेळी अचानक आलेल्या मोठ्या लाटेत तो पाण्यात ओढला गेला.

स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले हाेते. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या मृत्यूची नोंद जयगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *