Breaking News
चिपळूण : ओखा एक्स्प्रेसची धडक बसून खेड तालुक्यातील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा रत्नागिरी : महसूल विभागात मोठी खळबळ, उपजिल्हाधिकारी निलंबित, तर एकावर विभागीय चौकशीचे आदेश

खेड : दोन भावांवर डोक्यात कोयत्याने वार; दोघे गंभीर

banner 468x60

खेड तालुक्यातील आंबडस येथे एका व्यक्तीने दोन भावांवर लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली.

banner 728x90

या हल्ल्यात संजय गंगाराम चव्हाण (२६) आणि त्यांचा भाऊ नितीन गंगाराम चव्हाण (३६), दोघेही रा. आंबडस, ता. खेड ) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी संजय चव्हाण यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपी सतिश नथुराम साळुंखे (वय ४४, रा. धुत्रोली, ता. मंडणगड) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांचा भाऊ अजित याच्या घरी असताना ही घटना घडली.

अजित आणि वैष्णवी यांनी संजय आणि त्यांचे दुसरे भाऊ नितीन यांना अजितच्या घरी बोलावले होते. घरी गेल्यानंतर वैष्णवी वारंवार शिवीगाळ करत असल्याची तक्रार संजय यांनी आरोपी सतिशकडे केली. यामुळे संतप्त झालेल्या सतिशने संजयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

संजयने सतिशला शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, सतिशने जवळच पडलेला लोखंडी कोयता उचलून संजय आणि नितीन यांच्या डोक्यात मारला.या हल्ल्यामुळे परिसरात आरडाओरडा सुरू झाला. आवाज ऐकून फिर्यादीची पत्नी अरुणा, मुली काजल आणि पुनम तसेच नितीनची पत्नी मेघा चव्हाण घटनास्थळी धावल्या. संजय यांनी आपला जीव वाचवण्यासाठी आरोपीसोबत झटापट केली.

या हल्ल्यात जखमी झालेल्या संजय आणि नितीन यांना उपचारासाठी कामथे, ता. चिपळूण येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

संजय यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी सतिश साळुंखे याच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *