दापोली : कायदासाथी म्हणून पत्रकार मनोज पवार यांची नियुक्ती

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या दापोली तालुका विधी सेवा समितीच्या विधी सेवा समितीवर कायदासाथी म्हणून दापोलीतील जेष्ठ पत्रकार मनोज पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकार मनोज पवार हे दापोलीमध्ये 29 वर्ष पत्रकारितेत कार्यरत आहेत.

त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात तांदूळ घोटाळा, गहू घोटाळा, रॉकेल घोटाळा, लाकूड घोटाळा, पोषण आहारातील भ्रष्टाचार, नगरपंचायत मधील पाणी भ्रष्टाचार, अवैध लाकूडतोड, अशी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत.

त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दापोली तालुक्यात ज्या वाड्यांना विजेपासून वंचित ठेवण्यात आले होते त्या वाड्यांना वीजपुरवठा करण्यापासून अनेक समस्यांना वाचा फोडून संबंधित यंत्रणांना घाम फोडला आहे.

तसेच दापोलीमध्ये घडलेल्या तीन खून प्रकरणांमध्ये पोलिसांना खुन्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत देखील केली आहे. मनोज पवार हे दापोलीत अनेक संघटनांवर, संस्थांवर कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कडून कायद्यासाथी या करिता ऑनलाइन पद्धतीने मुलाखती पार पडल्या.

याचा नियुक्तीचा कार्यालयीन आदेश नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये दापोली विधी सेवा समिती व मनोज पवार, जितेंद्र पवार, प्रीतम पाटील, शुभम साखळकर, बाजीराव पवार, आकांक्षा घाणेकर, अथर्व बाक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांचे दापोलीत कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *