खेड तालुक्यातील काडवली-गजवाडी येथे नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदकामासाठी ठेवलेल्या १० लाख रुपये किमतीच्या जेसीबी मशिनच्या साहित्याची चोरी झाली होती.
याप्रकरणी खेड पोलिसांनी दोघांना नांदेड येथून अटक केली आहे. प्रल्हाद प्रकाश लाड यांनी ३ मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या मालकीचे जेसीबी मशिन विहिरीच्या खोदकामासाठी गजवाडी येथे ठेवण्यात आले होते.
चोरट्यांनी ३ टन वजनाच्या मशिनसह इतर सुटे भाग चोरून नेले होते. चोरीला गेलेल्या साहित्याची किंमत १० लाख रुपये होती. खेड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, पोलिसांना नांदेड येथील दोघांचा या चोरीत सहभाग असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी एक पथक नांदेडला पाठवून दोघांना अटक केली. दोन्ही संशयिकांना रेल्वेने खेडला आणले जात आहे. चोरीला गेलेले साहित्य नेमके कुठे आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
या चोरट्यांकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. या घटनेबाबत कोणालाही काही माहिती असल्यास त्यांनी खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















