रत्नागिरी : राज्यात आणि जिल्ह्यात गुढीपाडव्याचा उत्साह, आनंदाने करूया स्वागत नव्या वर्षाचं, नवचैतन्याने उजळू दे अंतरंग प्रत्येकाचं

banner 468x60

आनंदाने करूया स्वागत नव्या वर्षाचं,
नवचैतन्याने उजळू दे अंतरंग प्रत्येकाचं…
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हिंदू धर्मीय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. तो दिवस अखेर आला आहे.

banner 728x90

आज गुढीपाडवा, हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचा एक शुभ मुहूर्त आहे. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य.. नवा उत्साह.. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवास करुन पत्नी सीतासह अयोध्येत परतले होते, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनचा या दिवशी हा उत्सव साजरा करण्याची पद्धत.

याबाबत अशीही एक मान्यता आहे की, ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली होती, या कारणामुळे हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारण्याची पद्धत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *