रत्नागिरी : कातळशिल्प इतिहासाचा आरंभबिंदू

banner 468x60

कातळशिल्प हा कोकणचा कदाचित सर्वाधिक मोठा ठेवा आहे. हा शब्द कोकणवासियांसकट साऱ्यांनी गांभिर्याने घेतला पाहिजे. तो मराठी आहे म्हणून नव्हे, तर या कातळशिल्पांसाठी इतका दुसरा चांगला शब्द असू शकत नाही. इतिहासात प्रत्येकाने मोहेंजोदडो, हडप्पा, सिंधुसंस्कृती याबद्दल शिकले असेल; परंतु येत्या दोन वर्षांत शाळा, महाविद्यालये आणि पदव्युत्तर शिक्षणात कातळशिल्पांचा अंतर्भाव असेल. मी फार दूरचा उल्लेख करत नाही, दोन वर्षांतच आपला इतिहास कातळशिल्पांमुळे रत्नागिरीतून सुरू होईल, असा दावा केंद्रीय पंचायतराज आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य लेखापाल अखिलेश झा यांनी केला.युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या प्राथमिक यादीत कोकणातील कातळशिल्पांचे नाव जाहीर झाले आहे. त्यासंबंधी निसर्गयात्री संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाकरिता आलेल्या झा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भारताइतके प्राचीन दस्तावेजीकरण इतर कोठेही जगात झालेले नाही. आपले ऋषी उत्तम दस्तावेज बनवत, वेदांची सुक्ते वेगवेगळी आहेत त्यात कोणत्या ऋषीने कोणती सुक्ते रचली याचा उल्लेख आहे. एवढेच नव्हे प्रत्येक सूक्त कोणत्या छंदात व कोणत्या मीटरमध्ये आहे याचाही उल्लेख आहे. दस्तावेज बनवण्याचे इतके चांगले उदाहरण इतरत्र नाही. मात्र आपण आत्मसन्मानाच्या मागे न लागता विश्वगुरु बनण्याऐवजी विश्वातील सर्वोत्तम छात्र बनणे आवश्यक आहे. तसे बनून कातळशिल्प गांभिर्याने घेतले पाहिजे. कातळशिल्पांमुळे इतिहास रत्नागिरीतून सुरू झाला तर ते सर्वात मोठे यश असेल. कातळशिल्पांमुळे आर्थिक भरभराट, पर्यटनवाढ यापलिकडे ही महत्त्वाची गोष्ट आहे हे ध्यानी घ्या. झा म्हणाले की, आणखी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कातळशिल्पांच्या नोंदी करताना अनेक बाबींचा अभ्यास होणार आहे. आपल्याला त्या बाबींच्या नोंदीही करायच्या आहेत. कातळशिल्प ते आजचा काळ या दरम्यान अनेक गोष्टी अस्तंगत झाल्या आहेत. काही जीवजंतू नाहीत. हे वाता

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *