चिपळूण : आतीक बेबल आणि अब्दुल कादिर बुडालेल्या मुलांना शोधण्यासाठी पाण्यात सोडले कॅमेरे

banner 468x60

तालुक्यातील कुंभार्ली गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीतील वजहर याठिकाणी दोन मुले बुडाल्याची घटना रविवारी (९ जुलै) सायंकाळी घडली.

banner 728x90

कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi…

जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

शोध मोहिमेसाठी एनडीआरएफची टीम मागविण्यात आली आहे.

खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू एका जागेवरती पाणी 30 ते 35 फूट खोल असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी येत आहे.

मुलांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने पाण्यात कॅमरे सोडले. त्यामाध्यमातून मुलांचे मृतदेह शोधले जात आहे. एका जणाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध अजूनही सुरु आहे. दोन्ही मुलांनी पोहण्यासाठी उडी मारलेला डोह हा ३० ते ४० फूट खोल आहे. या डोहात ही मुले बुडाली.

पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहीम सुरु केली आहे. चिपळूण शहरातील आठ मुले सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी गेले होते.

त्यामध्ये इब्राहिम काजोरकर (गोवळकोट रोड), अब्रार हुसेन आंचरेकर (गोवळकोट रोड), फरहान हिदायत पिलपिले (खाटीकअली चिपळूण), अली नियाज सनगे (बेबल मोहल्ला, चिपळूण), जहिद हनीफ खान (कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (भेंडी नाका चिपळूण), आतीक इरफान बेबल (बेबल मोहल्ला), अब्दुल कादीर नोशाद लसणे (जिव्हाळा सुपर बाझार शेजारी, चिपळूण) यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *