चिपळूण–कराड मार्गावर वाहतूक कोंडी, कुंभार्ली घाटात अवघड वळणावर ट्रक बंद

Screenshot

banner 468x60

चिपळूण–कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात एका अवघड वळणावर ट्रक बंद पडल्यामुळे तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या घटनेमुळे गेल्या चार तासांपासून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवासी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभार्ली घाटातील वळणावर चढ चढताना ट्रक अचानक बंद पडला. अरुंद रस्ता व अवघड वळण असल्याने अन्य वाहनांना पुढे जाणे शक्य न झाल्याने वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. विशेषतः जड वाहने, खासगी बस, एसटी बस तसेच रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण झाला आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते. ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू असून, तो हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *