कुंभार्ली येथील नदीत चिंब भिजण्यासाठी गेलेल्या 8 विद्यार्थ्यांपैकी दोघेजण बेपत्ता झाले होते. त्या दोघांचे मृतदेह शिरगाव येथीलवाशिष्ठी नदीत सापडले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 तब्बल 24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश आले आहे.रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारासकुंभार्ली येथे वाशिष्ठीच्या डोहात ही दुर्घटना घडली. सहा मुलांनी भिजल्यानंतर काही वेळात पाऊस आल्याने जवळच्या छपराखालीआसरा घेतला. मात्र, कादिर लसणे व आतिक बेबल हे दोघे याच ठिकाणी डोहात थांबले. मात्र, काही वेळाने वरच्या बाजूला जोरातपाऊस झाल्याने मोठे पाणी आले. यावेळी हे दोघे पाण्यात बुडाले. वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेलीती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते. या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडेधाव घेतली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरा पाऊस व अंधारामुळे शोधकार्य राबविणे शक्य झाले नाही. सकाळच्यावेळी महाड येथून प्रशांत साळुंखे यांच्या रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. यानंतर जयगड येथून कोस्टगार्डची टीमहीदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली येथे दाखल झाली आणि त्यांनीही ऑक्सीजन व कॅमेरे लावून डोहात उतरून शोधकार्य सुरूकेले. मात्र, उशिरापर्यंत डोहामध्ये मृतदेह सापडत नव्हते. या टीमने खूप प्रयत्न केले. घळीमध्ये बांबू टाकून देखील पाहण्यात आले. मात्र, मृतदेह सापडले नाहीत. यानंतर पुन्हा एकदा नदीपात्रालगत शोध मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी 4 वाजण्याच्यादरम्यान यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत आढळला. त्यानंतर दुसर्याचा शोध सुरू झाला आणि5:30 वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील नदीतच पात्राच्या किनार्यावर दुसर्या मुलाचा मृतदेह आढळला. यानंतर हे शोधकार्यथांबले. दोन्ही मृतदेह शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह पालकांच्याताब्यात देण्यात येणार आहेत. शाळेला सुट्टी असल्याने मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शिकणारे इयत्ता दहावीतील आठ विद्यार्थी नदीत चिंबभिजण्यासाठी गेले होते. मात्र, घरामध्ये त्यांनी आपण फूटबॉल खेळायला जातो असे सांगितले होते. यामध्ये इब्राहिम काजोरकर(गोवळकोट), अब्रार हुसेन आंचरेकर (गोवळकोट), फरहान हिदायत पिलपिले (खाटीक आळी चिपळूण), अली नियाज सनगे (रा. बेबल मोहल्ला), जहिद हनीफ खान (रा. कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (रा. भेंडीनाका चिपळूण), आतीक इरफान बेबल(रा. बेबल मोहल्ला, अब्दुल कादीर नौशाद लसणे (रा. जिव्हाळा सुपर बाझार) हे विद्यार्थी भिजण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र, त्यातील दोघेजण बुडाल्याने चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील चिपळुण तालुका मुस्लीम संघटनेचे अध्यक्ष नाझीमअफवारे, शाहनवाज शाह तसेच शिरगाव व चिपळूण पोलिस यांनी घटनास्थळी शोधकार्य सुरू केले. सोमवारी (दि.10) सकाळीजेसीबी पाठवून डोहाकडे येणारे नदीचे पाणी तीन बांध घालून वळविण्यात आले. तसेच डोहामध्ये साचलेले पाणी बाहेरकाढण्यासाठी प्रवाह निर्माण करण्यात आला. त्याआधी महाड येथील रेस्क्यू टीम, काही स्थानिक ग्रामस्थ यांनी शोधण्याचा प्रयत्नकेला. मात्र, हाताला काही लागले नाही. …
कोकण
योगेश कदमांना मंञीपद मिळण्याची शक्यता , मंत्रीमंडळ विस्तार आज होण्याची शक्यता ? दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष
शिंदे – फडणवीस – पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच करण्याचा मानस आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 पुढील काही तासांत नव्यामंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रीमंडळ विस्तार आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. या नव्या मंत्र्यांमध्ये दापोलीचे आमदार योगेश कदम हे मंत्रीपदाची शपथ घेणार का ? याकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरी जिल्ह्याचेलक्ष लागून राहीले आहे. आठवडाभरापूर्वी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनीही शरदपवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजुनही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. तसेच, शिंदे गटातील इतर काहीआमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारकरुन खातेवाटप जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना (शिंदे गट) भाजपा यांच्यात मंत्रिपदासाठी चढाओढ आहे. अशातचशिंदेगटाचे दपोलीचे आमदार योगेश कदम यांचा या तरी मंत्रीमंडळात नंबर लागणार काय? याकडे सर्व दापोलीकरांसह रत्नागिरीजिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि…
चिपळूण : वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर, 70 वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार नकरता या डोहात उडी घेतली
वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेली ती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडे धाव घेतली. माञ ही सर्व माणसं येईपर्यंत तिथेच जवळ असलेल्या जयराज थरवळ यांनी हा आवाज ऐकताच त्यांचा शोध घेण्यासाठी सत्तर वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाहीविचार न करता या डोहात उडी घेतली. त्यांनी अनेकवेळा या ठिकाणी उडी घेऊन अनेकांना वाचविल्याचे सांगितले जाते. मात्र, वयोमानानुसार त्यांनाही दमछाक झाल्याने ते बाहेर आले. यानंतर त्यांचा मुलगा गणेश थरवळ यानेदेखील डोहात उडी मारूनशोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. माञ पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघांनाही ही मुलं सापडली नाहीत. कुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहे. स्थानिक म्हणजेच अलोरे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहतअसतात. मात्र, स्थानिकांना येथील पाण्याचा अंदाज असतो. चिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांनापाण्याचा अंदाज आला नाही. त्यात दोघे बुडाले. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…
रत्नागिरी : पर्यटनासाठी बिनधास्त या, रत्नागिरी पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना आवाहन
जिल्ह्यात २४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत विविध सण साजरे होणार आहेत. या काळात…
रत्नागिरी : अतिवृष्टीत बेघरांना ‘नाम’ वंत मॉडेल
नैसर्गिक आपत्ती आली की सर्वात मोठा प्रश्न हा पुनर्वसनाचा असतो. जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड तालुक्यात…
रत्नागिरी : ‘बारसू’वरून राजकारण तापलं; राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी
राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
गुहागर : 7 गावांमध्ये पाणी टंचाई
एप्रिलच्या सुरूवातीला पाणी टंचाईची झळ तालुक्यातील 7 गावांना जाणवू लागली असून त्यांनी टँकरची मागणी केली…
रत्नागिरी : कातळशिल्प इतिहासाचा आरंभबिंदू
कातळशिल्प हा कोकणचा कदाचित सर्वाधिक मोठा ठेवा आहे. हा शब्द कोकणवासियांसकट साऱ्यांनी गांभिर्याने घेतला पाहिजे….
गुहागर : 7 गावांमध्ये पाणी टंचाई
एप्रिलच्या सुरूवातीला पाणी टंचाईची झळ तालुक्यातील 7 गावांना जाणवू लागली असून त्यांनी टँकरची मागणी केली…
No More Posts Available.
No more pages to load.