रत्नागिरी : पत्नीला फोनवर तलाक देणाऱ्या सौदीतील दिलावर अब्दुल साखरकरवर गुन्हा दाखल

banner 468x60

19 सप्टेंबर 2018ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अध्यादेशास मान्याता दिली. त्यानुसार तीन वेळा तलाक असा उल्लेख केला तर तो गुन्हा ठरेल आणि या गुन्ह्यासाठी तीन वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय देऊन मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिला होता. या दिवसापासून देशात तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर ठरली. त्यानंतर केंद्र सरकारने हे विधेयक संसदेत मांडून कायदा केला आहे.

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे ती म्हणजे सौदी अरेबियातून फोनवर रत्नागिरीतील पत्नीला ट्रिपल तलाख देणाऱ्या पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ जुलै २०२३ रोजी ५.३० ते १३ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्यमनगर पटवर्धनवाडी येथे घडली आहे . दिलावर अब्दुल रशिद साखरकर ( ४२ , मुळ रा . लूलू दारुस सलाम अपार्टमेंट उद्यमनगर , रत्नागिरी सध्या , रा . सौदी अरेबिया ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे .

त्याच्या विरोधात पत्नीने गुरुवार दि . २५ जुलै रोजी सायंकाळी ४. ३३ वाजता शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली . त्यानुसार , दिलावर साखरकर याने २७ जुलै २०२३ रोजी पत्नीला फोन करुन तीन वेळा तलाक असे म्हणून चुकीच्या पद्धतीने तलाक देण्याचा प्रयत्न केला.


हा तलाक बेकायदेशीर असून मुस्लीम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण कायदा २०१९चे कलम ४ प्रमाणे असल्यामुळे शहर पोलिस स्थानकात या महिलेने तक्रार दाखल केली आहे. पो . नि . महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पो.उप नि . भगवान पाटील

यांनी संशयित आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा . पो . फौ . राजेंद्र सावंत करीत आहेत. मात्र दिलावर अब्दुल रशिद साखरकर सौदी अरेबियाला राहत असल्याने रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलाय मात्र यानंतरची प्रकरीया कशी पोलीस राबवतील हे पाहवं लागणार आहे.

‘तत्काळ तिहेरी तलाक’ आहे काय?
‘तत्काळ तिहेरी तलाक’ किंवा ‘तलाक-उल-बिद्दत’ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.


हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.
या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली.

कुराण कायद्याप्रमाणं तिहेरी तलाक कसा देतात?
मुस्लीम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे, त्याला ‘खुला’ असं म्हणतात.
पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो. अशा तलाकला फस्ख-ए-निकाह म्हणतात.


आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाहनाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो. याला तफविध-ए-तलाक असं म्हणतात, घटस्फोटाचे अधिकार पत्नीकडे हस्तांतरित करणं असा त्याचा अर्थ होतो.

पत्नीला तलाक हवा असेल तर शरियात काय तरतूद आहे?
मुस्लीम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे, त्याला ‘खुला’ असं म्हणतात. पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो. अशा तलाकला फस्ख-ए-निकाह म्हणतात.


आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाहनाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो. याला तफविध-ए-तलाक असं म्हणतात, घटस्फोटाचे अधिकार पत्नीकडे हस्तांतरित करणं असा त्याचा अर्थ होतो.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *