चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा जण बचावले आहेत. या घटनेचीमाहिती चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध कार्य सुरु केलं.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
रात्री उशिरा शोध कार्यथांबवण्यात आलं होतं. रात्री उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नाहीत त्यामुळे एन डी आर एफ ची टीम पथकाला पाचारण करण्यातआलं आहे.
चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी आली होती. त्यामध्येइब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट,फरहान हिदायत पिलपिले खाटीकअली चिपळूण, अली नियाजसनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडी नाका चिपळूण, आतीक इरफान बेबल.. रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचा समावेश होता.
शिरगाव येथील वझरयाठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहा जण एका झोपडी खाली जाऊनथांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली सदरचा डोह हा ३० ते ४० फूट खोल असून त्याच्या डोहातसापडल्यावर कोणीही वाचत नाही त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तर चिपळूण डी वाय एस पी राजेंद्रराजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानेएनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं आहे. करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती.
कुंभार्ली ग्रामपंचायतमार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसणे दोघेहीइयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण मधील अनेक बांधवांनी शिरगाव पोलीस ठाण्यात भेटदिली अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत.
चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश निगडेहे या सगळ्या प्रकरणी लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन विभागाच्या सगळ्या यंत्रणा येथे सज्ज ठेवण्यात आले आहेत.
चिपळूण नगरपरिषदेचे आपत्कालीन पथकही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून महाड येथील साळुंखे रेस्क्यूटीमला पाचारण करण्यात आला होते, हे पथक घटनास्थळी सकाळी दाखल झाल आहे.
या रेस्टॉरंट कडून या डोहात कॅमेरेसोडण्याचे काम चालू आहे. तसेच थोड्याच वेळात कोस्टगार्ड यांचीही टीम घटनास्थळी दाखल होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*