Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

लांजा : भरधाव स्विफ्ट कारची रिक्षाला धडक; चार जण जखमी

banner 468x60

दाभोळे-वाटुळ मार्गावरील शिपोशी गावाजवळ आज (गुरुवार) सकाळी ७.३० वाजता झालेल्या अपघातात, भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यात रिक्षामधील चार जण जखमी झाले आहेत.

banner 728x90 banner 728x90

या अपघातात रिक्षा (MH-05-EX-5186) मधील उमेश शिंदे, रुपेश नामदेव शिंदे, वैभव विश्वनाथ शिंदे, आणि आदेश खोत हे चौघे गंभीर जखमी झाले. तसेच रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभानवल्ली शिंदेवाडी येथील रिक्षा चालक उमेश नामदेव शिंदे (वय ३७) हे प्रभानवल्लीकडे रिक्षा घेऊन जात असताना, कुडाळहून दाभोळेकडे भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कार (MH-07-AS-0643) ने रॉंग साईडने येऊन रिक्षाला जोरदार धडक दिली. स्विफ्ट कार पर्शुराम राजेंद्र तिरोडकर (वय ३२, रा. कुडाळेश्वर मंदिराजवळ, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) हे चालवत होते.

या घटनेप्रकरणी लांजा पोलिसांनी पर्शुराम तिरोडकर यांच्याविरोधात खालीलप्रमाणे भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *