भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
तसेच (Orange Alert) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज (२१ जुलै) प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.गेले चार दिवस रत्नागिरी आणि चिपळूण येथे पावसामुळे नागरिकांचे माेठे हाल झाले. सध्या चिपळूणच्या वाशिष्ठी नदीची पातळी २.६० मी म्हणजेच इशारा पातळीच्या खाली आहे.
शहरात सध्या कोणत्याही ठिकाणी पाणी नाही. सध्या चिपळूण परिसरात पाऊस नसला तरी अधून मधून पावसाच्या सरी येताहेत. पावसामुळे वाशिष्टी नदीला आलेल्या पुराचा परिणाम मगरींवर झाला. पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मगरीही शहरात वाहून आल्या.
अशीच एक मगर चिपळूण शहराच्या जुना बाजार पुलावर होती. एका व्यक्तीने मगरीला पाहिलं आणि तिला दोरीने बांधलं. हा धक्कादायक असा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पुलावर एका मगरीला दोरीच्या सहाय्याने बांधण्यात आलं आहे.
एका व्यक्तीने मगरीला बांधलेली ही दोरी आपल्या हातात ठेवली आहे. मगर सुटकेसाठी धडपडते आहेच. पण त्या व्यक्तीवरही हल्ला करताना दिसते आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*