रत्नागिरी जिल्ह्यातील Lote MIDC परिसरात नळाच्या पाण्यात रासायनिक सांडपाणी आल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व ग्रामस्थांची प्रकृती ठिक असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
घटनेनंतर प्रभावित ग्रामस्थांना Primary Health Centre Lote येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सर्वांना प्रथमोपचार दिल्यानंतर तातडीने घरी सोडले. कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणात Maharashtra Pollution Control Board (एमपीसीबी) ने नळातील पाण्याचे नमुने २२ तारखेलाच ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठवले आहेत. घटनेचा प्राथमिक अहवाल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामस्थांची प्रकृती स्थिर असल्यामुळे Khed Police Station येथे संबंधित कारखान्याविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, अहवालानंतर परिस्थितीनुसार कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी असावी आणि औद्योगिक सांडपाण्याचा त्यात कोणताही संबंध नसावा, अशी ठाम मागणी केली आहे. या मागण्यांकडे Maharashtra Industrial Development Corporation (एमआयडीसी) प्रशासन कसे आणि कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














