मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या बसचा अपघात झाला. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा गोव्यातील प्रयोग आटपून संपूर्ण टीम मुंबईकडे परतत होती. भोस्ते घाट उतरत असताना बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. घाट उतरताना बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अपघातात नाटकाचे साउंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड हे जखमी झाले. विलास दाते यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांना तीन टाके घालावे लागले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रिक्षामधून कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच साहित्यप्रेमी उत्तमकुमार जैन यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व आवश्यक ते सहकार्य केले. दरम्यान, अपघातावेळी बसमध्ये सुमारे २५ जण प्रवास करत होते; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














