Breaking News
रत्नागिरी : महसुलाची गंगा, पण पर्यावरणाचा बळी, मंडणगड, दापोलीसह राजापुरात 50 वर्षांसाठी खाणपट्टे मंजूर रत्नागिरी : भररस्त्यात गाडीत बसून मद्यप्राशन, “तुमचे खोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करू” कोल्हापुरातील पर्यटकांची पोलिसांशी हुज्जत दाभोळ- दापोली परिसरात वीज पुरवठा खंडित; सलग दुसऱ्या दिवशीही नागरिक अंधारात,​उकाड्याने हैराण, पाणीपुरवठा विस्कळीत, महावितरणच्या कारभारावर संताप रत्नागिरी : दोन हजार रुपयांच्या वादातून मुलाने वडिलांना दुसऱ्या मजल्यावरून ढकलले रत्नागिरी : जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये अवैध मद्य वाहतूक उघड; 191 बाटल्या जप्त, दोन प्रवासी अटकेत

दाभोळ- दापोली परिसरात वीज पुरवठा खंडित; सलग दुसऱ्या दिवशीही नागरिक अंधारात,​उकाड्याने हैराण, पाणीपुरवठा विस्कळीत, महावितरणच्या कारभारावर संताप

banner 468x60

दाभोळ आणि परिसरातील आघारी, पंचनदी,कोळथरे, बोरिवली आडिवाडी,सह अनेक गावातील गेल्या ४८ तासांपासून भीषण वीज संकटाचा सामना करावा लागत आहे.

banner 728x90

सोमवार, २७ एप्रिल रोजी दिवसभर गेलेली वीज अद्यापही (मंगळवार सकाळपर्यंत) सुरळीत न झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


​नेमकी परिस्थिती काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी गेलेली वीज रात्र होईपर्यंत आली नव्हती. सायंकाळी 8:30 च्या सुमारास केवळ १५ ते २० मिनिटांसाठी वीज पुरवठा झाला, मात्र त्यानंतर 8:30पुन्हा बत्ती गुल झाली. ती संपूर्ण रात्र आणि आज मंगळवारी सकाळ उजाडली तरी वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही.



​वीज नसल्याने विहिरींचे व नळांचे पंप बंद पडले आहेत. परिणामी, अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा ठप्प झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे.

उकाड्याचा तडाखा: सध्या एप्रिल महिना असल्याने कडाक्याचे ऊन आणि आर्द्रता वाढली आहे. रात्री वीज नसल्याने लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण यांचे प्रचंड हाल झाले.

कामे खोळंबली: पिठाच्या गिरण्या, इंटरनेट सेवा आणि छोटे व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्याने आर्थिक नुकसानही होत आहे.
​”महावितरणने दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज बंद ठेवली होती. जर दिवसभर काम केले होते, तर मग रात्री पुन्हा वीज का गेली? प्रशासनाच्या नियोजनाअभावी सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *