Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : मुलानेच केला आई, बहिणीवर चाकूने हल्ला, बापालाही मारहाण

banner 468x60

दापोली तालुक्यातील भोपण येथे एका मद्यधुंद मुलाने जेवण करत असलेल्या आई आणि बहिणीवर चाकूने हल्ला केला, तर वडिलांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

banner 728x90 banner 728x90

ही धक्कादायक घटना १४ मे रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी स्वप्नील सुभाष वेळणस्कर (वय ३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील याची आई, त्यांचे पती आणि बहिण हे घरी जेवण करत होते.

त्यांचा धाकटा मुलगा स्वप्नील हा उशिरापर्यंत घरी न आल्याने आईने पती त्याला शोधण्यासाठी वाडीत गेले. काही वेळानंतर ते स्वप्नीलला घेऊन घरी आले. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता.


फिर्यादी यांनी त्याला जेवण वाढले, परंतु जेवण करत असताना तो त्यांना शिवीगाळ करू लागला. फिर्यादी यांनी त्याला उगाच ओरडू नको असे सांगितल्यावर त्याला राग आला. त्याने घरातील किचनमधील सुरी घेतली आणि फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पंजाला मारून त्यांना जखमी केले.

आईला वाचवण्यासाठी त्यांची मुलगी आणि तिचे पती धावले असता, स्वप्नीलने त्यांच्या हातातील सुरीने मुलगी आराध्या हिच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून तिलाही जखमी केले.

तसेच, त्याचे वडील सुभाष यांना हाताने मारहाण केली आणि मध्ये पडल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद १५ मे रोजी दुपारी १२.५६ वाजता दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *