चिपळूण : अपत्य न झाल्याच्या मानसिक तणावातून 27 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. २७ वर्षीय विवाहित महिलेचा अपत्य न झाल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

banner 728x90

जयश्री विजय मोहिते (रा. आकले तळवडेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री यांचा विवाह ५ मार्च २०१७ रोजी विजय भगवान मोहिते यांच्याशी झाला होता. विवाहाला सात वर्षे पूर्ण होऊनही त्यांना अपत्य झाले नव्हते. यामुळे त्या गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. या

मानसिक अवस्थेतून त्यांनी २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास विषप्राशन केल्याची घटना घडली.
ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचार सुरू असतानाच २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजून ४६ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूमागील नेमकी कारणे स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मानसिक तणाव आणि कौटुंबिक दबाव यासारख्या मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *