रत्नागिरी शहरातील मध्यवस्तीत एका अल्पवयीन तरुणीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही तरुणी पाली नजीकच्या गावातील असून ती अकरावी इयत्तेत शिकत होती.
या तरुणीचे रत्नागिरीतील एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जाते. सदरची तरुणी ही शहरातील मारुती मंदिर व शिवाजी मैदान जवळ असणार्या त्या तरुणाच्या घरी आली होती. यावेळी तरुणाने तिच्याशी प्रेमाचे नाटक केल्याचे तिच्या निदर्शनास आल्याने अखेर तिने तेथेच गळफास लावून आत्महत्या केली.
सदरच्या तरुणीचा मृतदेह शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे आणण्यात आला. यावेळी सदर मुलीच्या आईने जोरजोरात किंचाळ्या केल्या. त्या ऐकून ऐकणार्यांनी कानावर हात घेतले, इतकी आर्त हाक होती. माझ्या मुलीला मारुन टाकले, असे ती म्हणत होती. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
दरम्यान या प्रकरणी पोलिस तपास सुरु असून सदर मुलीच्या गावातून संतापजनक भावना व्यक्त होत आहेत. प्रेम निभावता येत नसेल तर करायचेच कशाला? असे तेथे जमलेल्या काहींनी सांगितले. यावेळी मुलीने गळफास लावून आत्महत्या केली नसून तिला मारुन टाकले, असेही काही लोक बोलताना ऐकावयास मिळाले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















