रत्नागिरीमध्ये एका महिला वकिलाचा पाठलाग करुन तिला त्रास देणाऱ्या वकिलाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
नृपेन सिद्धार्थ कांबळे (३६, रा. देवधे, ता. लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. महिला वकिलाच्या तक्रारीनुसार, नृपेन हा मागील महिन्याभरापासून त्रास देत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिला वकिलाच्या तक्रारीनुसार, नृपेन हा सातत्याने पाठलाग करुन ‘तुझ्याशी बोलायचे आहे, दोन मिनिटे बोल, अशी विनंती करत होता.
मात्र आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे महिला वकिलाकडून स्पष्ट करण्यात आले होते. नृपेन याचा त्रास वाढत चालल्याने महिला वकिलाने या संबधी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसांकडून नृपेनला समज देण्यात आली होती.
तसेच त्याच्या पालकांनी यापुढे असा प्रकार होणार नाही, अशी हमीही दिली होती. पोलिसांकडून समज देवूनही १० फेब्रुवारी रोजी नृपेन याने तक्रारदार यांचा पुन्हा एकदा पाठलाग केला. तसेच दोन मिनिटे बोलायचे आहे, माझे म्हणणे ऐकून घे, अशी विनवणी करू लागला. तसेच एकदा लग्नाचे काय ते सांग, असे बोलू लागला.
दरम्यान नृपेनच्या त्रासाला कंटाळून महिला वकिलाने रत्नागिरी शहर पोलिसांत पुन्हा एकदा तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी नृपेनविरुद्ध भारतीय न्याय संहिता ७८ (२) व ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















