रत्नागिरी : 31 फर्स्ट आधीच रत्नागिरी पोलिसांनी नष्ट केला 10.033 किलोग्रॅम गांजा, 3.98 किलोग्रॅम केटामाईन

banner 468x60

रत्नागिरी पोलिसांनी गेल्या १४ वर्षात विविध १२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा आणि ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन असा एकूण १४.०१३ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केला आहे.

नवी मुंबईतील तळाेजा येथे रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पापोलिसांनी अंमली पदार्थ जाळून नष्ट केला. पोलिस महासंचालकांकडून एन. डी. पी. एस अॅक्ट १९८५ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्दे माल नाश करण्याकरिता सर्व पोलिस अधीक्षकांना निर्देश देण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे आहेत. सन २००६ ते सन २०२० या कालावधीत गुंगी कारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ या कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण १२ एन. डी. पी. एस. कायद्यांतर्गत गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करुन घेतले होते.

हा मुद्देमाल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आला होता.त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून हा मुद्देमाल नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. येथे नाश करण्याची मंजुरी दिली होती.

त्यानुसार पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व पथकाने शुक्रवारी जिल्ह्यामध्ये एकूण दाखल १२ विविध गुन्ह्यातील १०.०३३ किलोग्राम गांजा व ३.९८ किलोग्राम केटामाईन असा मुद्देमाल जाळून नष्ट केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *