Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

संगमेश्वर : रावणंगवाडी पूल वाहतुकीस खुला करण्याची मागणी

banner 468x60

नाबार्डच्या पायाभूत सुविधेतर्गत सन २०१५/१६ मध्ये देवरुख-वाशी-चाफवली-देवळे मार्गावर सुमारे ८ वर्षांपूर्वी सव्वादान कोटी रुपये खर्चुन पूल शासनान नागरिकांसाठी बांधला आहे पण अद्याप त्यावर वाहतूक नाही.

हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार, असा सवाल देवरुखच्या क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी विचारला आहे.चाफवली, देवळे, करंजारी, चोरवणे, नाणीज भागातील लोकांना देवरुखला जोडण्यास हा पुल महत्वाची कामगिरी बजावणार आहे. शासनाची पूल उभारण्यापाठीमागचा उद्देश चांगला होता.

परंतु पूल पूर्ण होऊन ८ वर्षे झाली तरीही नागरिक त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत, अशी खंतही कोळवणकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आजूबाजू‌चा निसर्गरम्य परिसर पर्यटनासाठी अनुकूल आहे.

त्यामुळे पूल वाहतुकीस लवकरात लवकर खुला करा नाही तर भुताचा पूल म्हणून पर्यटनस्थळ घोषित करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.देवळे-चाफवली-करंजारी- चोरवणे-नाणीज भागातील लोक देवरूखला कामासाठी लवकर पोहोचू शकतात.

त्याबरोबर देवरूख बाजारपेठेला त्याचा फायदा होऊ शकतो. अनेक गावे देवरूखला जोडून थेट व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते तर या सुविधेचा लाभ का मिळू नये, असा सवाल कोळवणकर यांनी विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *