Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

गुहागर : आगारातून लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या बंदच

banner 468x60

गुहागर आगारातून लांब पल्ल्याच्या काही बसफेऱ्या बंदच आहेत. या बाबत कोकण प्रवासी संघटनेचे अनिलकुमार जोशी यांनी गुहागर आगारप्रमुख व विभाग नियंत्रक कार्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

banner 728x90 banner 728x90

गेले सहा महिने लांब पल्ल्याच्या गुहागर आगाराच्या तुळजापूर, अक्कलकोट, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर या बसफेऱ्या बंदच आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

गुहागर आगार व रत्नागिरी जिल्हा विभाग नियंत्रक कार्यालयास वारंवार कळवूनही कारभार ढिम्मच आहे. ज्येष्ठ पत्रकार व प्रवासी संघटनेचे अनिलकुमार जोशी यांनी याबाबत गुहागर डेपो मॅनेजर कांबळे यांच्याकडे संपर्क साधला असता बसफेऱ्या सुरू झाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.


सध्या गाड्यांची संख्या व २०० कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शाळा चालू असल्याने एसटी गाड्या तिकडे वापरल्या जातात. १५ एप्रिलनंतर तुळजापूर, अक्कलकोट, पिंपरी- चिंचवड, कोल्हापूर सुरू होतील, असे रत्नागिरी विभाग नियंत्रक कार्यालयाकडून कळवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *