दापोली : मृत्यूनंतरही मरणयातना! आघारी गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही, अंत्यविधीसाठी उतरावं लागतंय डोंगर

banner 468x60

दापोली तालुक्यातील आघारी गावात ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. मृत झालेल्यांचा अत्यंसंस्कार करण्यासाठी रस्ता नसल्याने आघारीतील ग्रामस्थांना डोंगर उतरून स्मशानभूमीत जावं लागतंय.

स्मशानभूमीकडे जाण्यास चांगला रस्ता नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी आघारीतील नागरिकांनी केली आहे.

आजही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. या सोयी सुविधेकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळं नागरिकांना आता मरणानंतरही हाल भोगावे लागत आहेत.स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेतयात्रा नेताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणे हे दूरच राहिले आहे. रस्ता नसल्यानं नागरिकांना दगड गोटे तुडवीत, नादुरुस्त रस्त्यावरुन, जंगल भागातून प्रेत यात्रा न्यावी लागत आहे.

मृत्यूनंतरही मरण यातना नागरिकांना भोगावी लागत आहेत. अशा एकंदरीत परिस्थितीमुळं लोकांना जिवंतपणीच मरणाची भीती वाटू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *