Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

रत्नागिरी : कोकण हापूस आधीच आफ्रिकेचा ‘मलावी’ हापूस बाजारात

banner 468x60

आंबा म्हटला की, सर्वात आधी आठवतो तो कोकणचा हापूस आंबा. हा आंबा गुढीपाडव्याला बाजारात दाखल होतो आणि त्यानंतर खवय्यांना तो खायला मिळतो.

मात्र, कोकणचा हापूस बाजारात दाखल होण्यापूर्वीच आफ्रिकेतील ‘मलावी’ आंबा रत्नागिरीच्या बाजारात दाखल झाला आहे.

हापूस आंब्यासारखाच दिसणाऱ्या या आंब्याची आठवडाभरात २०० डझन विक्री झाली असून, ३५०० रुपये डझन दराने त्याची विक्री हाेत आहे. मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमध्ये ‘मलावी’ देशातून या हापूसची आवक सुरू झाली आहे.

महाराष्ट्र व गुजरात राज्यांत या ‘मलावी’ हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘मलावी’ हापूसची आवक भारतात होत आहे.

हा आंबा सध्या रत्नागिरीच्या बाजारात दाखल झाला असून, ३,५०० रूपये डझन दराने त्याची विक्री सुरू आहे. रंगीत वेस्टन लावून बाॅक्स पॅकिंगमधून त्याची विक्री केली जात आहे. ‘मलावी’ आंब्याची चव कोकणातील हापूसप्रमाणेच आहे.

त्यामुळे रत्नागिरीकरही ताे खरेदी करून त्याची चव चाखत आहेत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कोकणातील हापूस आंब्याची कलमे आफ्रिकन देश ‘मलावी’ येथे नेऊन लागवड करण्यात आली होती.

चारशे ते पाचशे एकर क्षेत्रावर हापूस लागवड करण्यात आली आहे. तेथील हवामानानुसार हा आंबा नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरमध्ये विक्रीला येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *