गेली अनेक वर्षे कबड्डी क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या जिल्ह्यात एकदा तरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा व्हावी हे सर्व कबड्डीप्रेमींचे स्वप्न आहे. या वेळी ही संधी महाराष्ट्राला मिळणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ही स्पर्धा घ्यावी या विषयीच्या चर्चेसाठी पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) व उद्योजक किरण सामंत यांची भेट घेतली.
त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण सचिन कदम (Sachin Kadam) यांनी दिले. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षासोबतच असून पक्षाशी गद्दारी ही आमच्या रक्तात नाही, अशी स्पष्ट भूमिकाही जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी मंगळवारी स्पष्ट केली.

गेल्या दोन दिवसापांसून पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांची जिल्हाप्रमुख कदम यांच्या भेटीविषयाची चर्चा सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू आहे. जिल्हाप्रमुख सचिन कदम हेही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली.
त्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर कदम यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पालकमंत्री तसेच किरण सामंत यांची भेट घेण्यामागे राजकीय हेतू नव्हता.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात झालेली नाही. तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी देखील आम्ही सर्व एकसंघ असून होऊ दे चर्चा, या उपक्रमांतर्गत पक्षाची नाळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.
या वेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख शशिकांत मोदी, राकेश शिंदे उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













