दापोली : हर्णे समुद्र किनाऱ्यावर घोस्ट नेट हटाव मोहीम, 115 किलो टाकाऊ फिशिंग जाळे हटवून सागरी जीवांना दिला दिलासा
जागतिक कांदळवन दिन (World Mangrove Day) निमित्त हर्णे समुद्र किनाऱ्यावर पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ‘घोस्ट नेट हटाव’ मोहीम राबविण्यात आली. JNK Marine Aqua Life, हर्णे, Ratnagiri Ornamental Fish Farmer Trust, Wild Animal Rescue Trust, दापोली आणि Seva Charitable Trust, हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या मोहिमेत समुद्र किनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकलेले सुमारे ११५ किलो टाकाऊ व खराब फिशिंग जाळे (Ghost Nets) काढून सुरक्षित विल्हेवाटीसाठी जमा करण्यात आले.
समुद्रात टाकून दिलेली किंवा अडकून पडलेली ही जाळी समुद्री कासव, मासे, खेकडे, प्रवाळ आणि इतर सागरी जीवांसाठी मोठा धोका ठरत होती. ही जाळी हटविल्यामुळे सागरी जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मोठी मदत झाली असून समुद्री परिसंस्थेला दिलासा मिळाला आहे.
या मोहिमेत Wild Animal Rescue Trust, दापोलीचे सचिव तुषार महाडिक व त्यांची टीम, दापोली वनविभागाचे वनरक्षक प्रभू साबणे, विश्वंभर झाडे, शुभांगी गुरव, Seva Charitable Trust, हर्णेच्या अध्यक्षा सना काझी, उपाध्यक्षा सारिखा पवार, Ratnagiri Ornamental Fish Farmer Trustचे अध्यक्ष फहाद जमादार, तसेच हर्णे ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी सागरी जैवविविधतेचे संवर्धन, समुद्री प्रदूषण रोखणे आणि किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी याबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. भविष्यातही अशा पर्यावरणपूरक मोहिमा सातत्याने राबविण्याचा निर्धार सहभागी संस्थांनी व्यक्त केला.
या यशस्वी उपक्रमामुळे हर्णे समुद्र किनाऱ्यावरील सागरी परिसंस्थेच्या संरक्षणाला मोठी चालना मिळाली असून स्थानिक नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत करत सहभागी संस्थांचे कौतुक केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













