चिपळुणात जप्त मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील पेठमाप गणेशवाडी येथे जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे सील तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश करून वास्तव्यास राहिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


banner 728x90

या प्रकरणी सागर सुभाष कदम (वय ३२, व्यवसाय – सहाय्यक व्यवस्थापक तथा विशेष वसुली व विक्री अधिकारी, वरदायनी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी गौरी देवषी गवळी (वय ६५), संतोष देवषी गवळी (वय ४८), रवि देवषी गवळी (वय ४२) आणि राजू देवषी गवळी (वय ५१, सर्व रा. पेठमाप गणेशवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी फिर्यादी यांनी संबंधित जागेची पाहणी केली असता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांच्या २९ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार वरदायनी सहकारी पतसंस्थेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेवरील अधिकृत सील व शिक्के तोडून आरोपींनी बेकायदेशीररित्या जागेत प्रवेश करून वास्तव्यास राहिल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी सरकारी आदेशाचे उल्लंघन, फौजदारीपात्र अतिक्रमण तसेच इतर संबंधित तरतुदींनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३२९, २२३, ३(५) तसेच संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *