चिपळूण : पूजेसाठी गावी आलेल्या तरुणाचा अकाली मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे मुंबईहून गावी आलेल्या ३० वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पंकज नथुराम कदम (वय ३०, रा. गोवळकोट ढवळनाका, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकजचा भाऊ राकेश कदम हा सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त मुंबईहून गावी आला होता. शनिवारी दुपारपासून पंकज घराबाहेर न पडल्याने राकेश याने त्याला अनेकदा हाक मारली. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता पंकज हा टेबलावर निपचित अवस्थेत पडलेला आढळला.

ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांमध्ये एकच घबराट उडाली. नेमके काय घडले हे कोणालाच समजू शकले नाही. तत्काळ पंकजला रिक्षामधून कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

पंकज हा मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी व्हिसेरा तपासासाठी राखून ठेवला आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाडिक करत आहेत.

अविवाहित असलेल्या पंकजच्या पश्चात तीन भाऊ, भावजयी आणि मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *