Breaking News
चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ लांजा : हर्चे शाखा डाकघरात 8.20 लाखांचा अपहार, तत्कालीन शाखा डाकपालाविरोधात गुन्हा

खेड : भोस्ते घाटातील ‘हा’ वळण अजूनही धोकादायक

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाटातील वाहतूक चौपदरीकरणानंतर सुलभ झाली असली तरी एक तीव्र उतार असलेले नागमोडी वळण मात्र अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना डोकेदुखी ठरले आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


गोव्याहून मुंबईच्या दिशेने घाट उतरताना अवजड वाहनांचे या वळणावर अनेकदा अपघात झाले आहेत. चौपदरीकरणाचे काम करताना भोस्ते घाटातील बहुतेक तीव्र व नागमोडी वळणे काढण्यात आली आहेत.


मात्र, घाटाच्या शेवटच्या टप्प्यात असलेले तीव्र उतार व यू इंग्रजी आकाराचे हे वळण या मार्गावरून नियमित मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या अनुभवी चालकांनासुद्धा धोकादायक ठरले आहे.


भोस्ते घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, घाटाच्या बाजूला केलेल्या डोंगर कटाईमुळे गेल्यावर्षी तब्बल पाचवेळा भूस्खलन झाले होते.


आता या घाटात काही ठिकाणी दरड कापण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा वाहतूक करणारी मार्गिका सुरक्षित झाल्याचे दिसून येते.


मात्र, भोस्ते घाटातील धोकादायक आणि तीव्र उतार असलेले हे यू आकाराचे वळण अजूनही अपघातग्रस्त ठिकाण बनले आहे. या वळणावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी सुमारे शंभर मीटर अंतरावर तब्बल दहा मोठे मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत.


मात्र, या अवघड वळणावर अपघात रोखण्यासाठी अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे घाटातील प्रवास अजूनही सुकर झालेला नाही. यावर्षीही पावसाळ्यात या घाटातून जपूनच प्रवास करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *