जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, प्रचाराचा जोर आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार, आज ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता जाहीर प्रचार समाप्त होणार आहे. त्यानंतर प्रचार केल्यास आचारसंहितेचा भंग मानून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या २९ जानेवारीच्या आदेशानुसार, रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१’ मधील कलम २८-ब नुसार, मतदानाच्या वेळेपूर्वी किमान २४ तास आधी जाहीर प्रचार थांबवणे बंधनकारक आहे. या नियमानुसार ५ फेब्रुवारीला रात्री १० वाजता प्रचाराची मुदत संपत आहे.
प्रचार संपल्यानंतरच्या कालावधीसाठी प्रशासनाने उमेदवार आणि प्रतिनिधींसाठी स्पष्ट निर्देश जारी केले आहेत ते खालील प्रमाणे सभा व मोर्चांवर बंदी: ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या जाहीर सभा, पदयात्रा किंवा मोर्चे काढता येणार नाहीत.
ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई असेल प्रचारासाठी लाऊडस्पीकर किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर पूर्णतः बंद राहील.निवडणूक प्रचाराशी संबंधित कोणत्याही जाहिरातींचे प्रसिद्धीकरण किंवा माध्यमांवरील प्रसारण थांबवणे अनिवार्य आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उमेदवाराविरुद्ध अधिनियमाच्या पोटकलम २ अन्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.आचारसंहितेचे पालन करून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














