चिपळूण : सुनील तटकरे विरूद्ध भास्कर जाधव पुन्हा रंगणार सामना

banner 468x60

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात महत्वाची भूमिका बजावणारे खासदार सुनील तटकरे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट शिवसेना, राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

राष्ट्रवादी फुटण्यापूर्वीच आमदार भास्कर जाधव यांनी रायगडमध्ये जाऊन ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मेळावा घेतला आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भविष्यात लोकसभेला तटकरे विरुद्ध जाधव हे पारंपरिक राजकीय विरोधक पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. दापोली, गुहागर, महाड, श्रीवर्धन, पेण आणि अलिबाग असे सहा आमदार या मतदारसंघात येतात. दापोलीचे योगेश कदम, महाडचे भरत गोगावले आणि अलिबागचे महेंद्र दळवी हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत.

पेणचे रवींद्र पाटील भाजप, श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे फुटलेली राष्ट्रवादी आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारचे रायगड लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत आहे. या मतदात संघात राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्यापूर्वी धैयेशील पाटील यांचे नाव भाजपकडून लोकसभसाठी आघाडीवर होते. धैर्यशील पाटील यांचा शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांचे वडील मोहन पाटील पेण मतदार संघात आठवेळा आमदार होते.

त्यामुळे पाटील हे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना आव्हान देऊ शकतात, असे चित्र होते; मात्र राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या सरकारमध्ये सामील झाल्यामुळे विद्यमान खासदार तटकरे यांचेही नाव पुढे येत आहे. त्यामुळे लोकसभेसाठी विद्यमान सरकारकडून पाटील की तटकरे याची सर्वांना उत्सुकता आहे.
केवळ पक्षाचा आदेश म्हणून सुनील तटकरे यांनी दोनवेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती;

मात्र त्यांचे लक्ष नेहमीच राज्याच्या राजकारणात होते. तटकरेंची भक्कम साथ मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी फोडता आली. तटकरेंच्या बंडानंतर रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पाय अधिक खोलात गेले आहेत. गुहागरचे आमदार शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावर या मतदार संघाची मदार आहे.

सहापैकी विधानसभेच्या पाच मतदार संघावर विद्यमान सरकारचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीमध्ये भास्कर जाधव लोकसभेची निवडणूक लढवतील किंवा नाही हे अनिश्चित आहे; मात्र तटकरे विरुद्ध जाधव हा सामना पुन्हा पाहायला मिळणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *