Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

राजापूर : तरुणीच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेप, दोन तरुणींवर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील भालावली गावात जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात दोन महाविद्यालयीन तरुणींवर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात साक्षी गुरव या तरुणीचा मृत्यू झाला, तर दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली होती.

banner 728x90 banner 728x90

ही घटना १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भालावली येथील वरी गुरववाडी परिसरात घडली होती. गावात सुतक-सुवेर पाळणे तसेच गावदेवतेच्या दास्तानाच्या हक्कावरून दोन गटांत तीव्र वाद सुरू होता. या धार्मिक वादातूनच प्रकरणाला हिंसक वळण लागल्याचे तपासात निष्पन्न झाले.नवदुर्गा मंदिराचे दास्तान मयूर गुरव यांच्या कुटुंबाकडे असून, याला विरोधी गटाचा आक्षेप होता. याच कारणावरून मयूर गुरव व त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देणे, शिवीगाळ करणे व मानसिक त्रास देण्याचे प्रकार यापूर्वीही घडले होते.

याबाबत पोलिसांत तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.दरम्यान, घरकुल बांधकामावरून सुरू असलेल्या जुन्या वादामुळे तणाव अधिक वाढला होता. न्यायालयीन स्थगितीमुळे आरोपी विनायक गुरव याच्या मनात मयूर गुरव यांच्या कुटुंबाविरोधात तीव्र राग होता. याच रागातून त्याने हा हल्ला केल्याचे तपासात स्पष्ट झाले. घटनेच्या दिवशी मयूर गुरव यांची बहीण साक्षी गुरव व शेजारील तरुणी सिद्धी संजय गुरव या दोघी महाविद्यालयातून पायी घरी परतत असताना आरोपीने संतोष गुरव यांच्या आंबा बागेजवळ त्यांना अडवले. “तुमचे खानदान संपवून टाकीन,” अशी धमकी देत त्याने लाकडी दांड्याने दोघींच्या डोके व मानेवर जोरदार वार केले. यात दोघी गंभीर जखमी झाल्या.

कुटुंबीय व ग्रामस्थांनी तातडीने दोघींना धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच साक्षी गुरव हिला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी मयूर गुरव यांनी राजापूर-नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भादंवि कलम ३०२, ३२६, ५०६ व २०१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

तपास अधिकारी आबासो पाटील यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनाद्र फणसेकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. एकूण १४ साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला खून, प्राणघातक हल्ला, धमकी व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *