रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा बदल, ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत; अन्यथा अपात्र

banner 468x60

राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने आता कठोर पाऊल उचलले आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून यासाठीची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार योजनेच्या सुरुवातीला घातलेल्या अटी डावलून अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते.यामुळे केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने ई-केवायसीची अट अनिवार्य केली आहे.

31 डिसेंबरपर्यंत करा ई-केवायसी

ई-केवायसी करण्याची मूळ मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती मात्र लाखो महिलांचे ई-केवायसी अपूर्ण राहिल्याने ही मुदत वाढवून 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेक महिलांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विभागाने संगणकीय प्रणालीत सुधारणा केली आहे.यापुढे ई-केवायसीची जबाबदारी थेट अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे.ज्या महिलांचे ई-केवायसी झालेले नाही त्यांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका कागदपत्रे गोळा करतील.त्यांच्या मदतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आता लाभार्थ्यांसाठी अधिक सोपे होणार आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या महिला 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.यामुळे त्यांना लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणारे दरमहा 1500 रुपये मिळणे बंद होईल.

सध्या या योजनेचे अडीच कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. त्यामुळे पात्र महिलांनी योजनेचा लाभ अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी तातडीने अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *