Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे मुलाला उमेदवारी नाकारली

banner 468x60

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत (Ratnagiri Nagar Parishad Election) शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) गेलेल्या माजी नगराध्यक्ष राजन साळवी (Rajan Salvi) यांचा मुलगा अथर्व साळवी (Atharva Salvi) यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

यामुळे राजन साळवी यांना रत्नागिरी (Ratnagiri News) मोठा झटक्या बसल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेने अथर्व साळवी यांच्या ऐवजी जागा भाजपला सोडण्याची तयारी दाखवली आहे. तर दुसरा पर्याय म्हणजे भाजपमधील एखादा आयात उमेदवार घेऊन त्याला शिवसेनेत दाखल करून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या दोन पर्यायांमुळे प्रभाग 15 मधील राजकीय समीकरणांमध्ये ट्विस्ट कायम असल्याचे दिसून येते.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 15 मधूनच राजन साळवी यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्षपद देखील राजन साळवी यांनी भूषवले आहे. तर राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी हे प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होते. मात्र शिवसेनेने राजन साळवी यांच्या मुलाला रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली आहे.अथर्व साळवी यांना उमेदवारी न मिळाल्याने राजन साळवी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर प्रभाग 15 अंतिमतः कोणत्या पक्षाकडे जाणार? राजन साळवी आता काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *