लोटे एमआयडीसी परिसरातील तीन कंपन्यांनी नदीचे पाणी दूषित केल्याचा आरोप असून याप्रकरणी कोतवली ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षता तांबे यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
https://www.instagram.com/reel/DQjOLd4jfaA/?igsh=NWVhZnZoeTJzcnFp
https://www.facebook.com/share/v/1DDdLDRmv3/?mibextid=wwXIfr
तक्रारीच्या आधारे योजना ऑर्गॅनिक्स, पुष्कर केमिकल्स आणि श्रेष्ठा ऑर्गॅनिक या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२५ ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संबंधित कंपन्यांनी सोनपात्रा नदीमध्ये दूषित सांडपाणी सोडल्याचे निष्पन्न झाले आहे.
या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिक, जनावरे आणि वन्यजीव यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून मासेमारी व्यवसाय तसेच शेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
नदीचे पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
परिसरात पर्यावरणीय संतुलन बिघडल्याची गंभीर बाब लक्षात घेता पोलिसांनी संबंधित कंपन्यांविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















