चिपळुण : 3 लाखाची ऑनलाईन फसवणूक

banner 468x60

विमा पॉलीसी सरेंडर करुन बँके खात्यात पैसे जमा करतो असे सांगून बँक खात्यामधून 2 लाख 97 हजार 999 रुपये काढून ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना 4 जुलै रोजी घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

4 जुलै रोजी सायंकाळी रात्री 8.15 च्या सुमारास मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी टोल फ्री व मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाईट वरुन एका अज्ञाताने फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर

संपर्क करुन पॉलीसी सरेंडर करुन फिर्यादी यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यात पैसे डिपॉझिट करतो असे सांगून त्याच्या बँके खात्यामधून एकूण 2 लाख 97 हजार 999 रुपये परस्पर संमत्तीशिवाय काढून ऑनलाईन फसवणूक केली.

हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *