रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीने वैयक्तिक तणावातून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपत घाडगे (वय ५४ वर्ष, रा. पोफळी रूम नं. ६४/१, ता. चिपळूण) यांनी २३ जानेवारी २०२६ रोजी रात्री जेवण केल्यानंतर, त्यांच्या वैयक्तिक तणावातून घरात असलेले फवारणीचे कीटकनाशक/बुरशीनाशक औषध प्राशन केले. औषध प्यायल्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्याने ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली.
संतोष घाडगे यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच, त्यांचे पुत्र निकिल संतोष घाडगे व नातेवाईकांनी त्यांना तातडीने खाजगी वाहनाने औषधोपचारासाठी परशुराम हॉस्पिटल घाणेखुंट येथे २४ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने सायंकाळी ५:०० वाजता त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरविण्यात आले.
मुंबईला घेऊन जात असताना संतोष घाडगे यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या उपजिल्हा रुग्णालय कळंबणी (ता. खेड) येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता, रात्री २२:१५ वाजता मृत घोषित केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













